Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि ज्यांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकवून बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांचा धनी विश्वासी असल्यास त्यांना ते बंधूसारखे आहेत, त्यांनी त्यांचा अवमान करू नये, उलट जास्त आदराने सेवा करावी, कारण जे तुमच्या सेवेचा लाभ घेणारे आहेत ते विश्वासणारे व प्रिय आहेत. या गोष्टी त्यांना शिकवून पालन करण्यास सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:2
31 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?”


तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात.


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.


त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,


आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,


कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.


ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.


इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :


म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,


ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


धन्यांनो, तुम्हांलाही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे, आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे.


ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव.


वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.


तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल.


ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.


हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत;


म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.


कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.


तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो :


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.


तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan