Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:11
40 Iomraidhean Croise  

नंतर पाहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहूदातून बेथेल येथे आला; त्या वेळी यराबाम हवन करीत वेदीजवळ उभा होता.


त्याला वाटेवरून परत आणणार्‍या त्या संदेष्ट्याने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराच्या तोंडचे वचन अवमानणारा देवाचा माणूस तो हाच, म्हणूनच परमेश्वराने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले आणि परमेश्वराने त्याला सांगितलेल्या वचनाप्रमाणे सिंहाने त्याला फाडून ठार केले असावे.”


तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?”


ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”


तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही’ असे अरामी लोक म्हणाले आहेत, ह्यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांला जाणीव होईल.”’


मग राजाने तिसर्‍यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्‍या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.


ह्यावर राजाने पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन एलीयाकडे पाठवले. एलीया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वतशिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे की, ‘तू खाली उतरून ये.”’


मग त्याने विचारले, “माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे?” नगरातील लोकांनी त्याला सांगितले की, “तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहूदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे.”


इकडे देवाचा माणूस अलीशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की, “अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली; परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्यामागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.”


देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.


आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला;


वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.


जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बर्‍याची फेड वाइटाने करणारे मला विरोध करतात.


दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.


“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या.


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्‍या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.


प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.


जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.


नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.


देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा :


आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली.


कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा.


म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वत:ला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.


तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.


तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस;


ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.


मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिसरात फारोच्या घरी दास्य करीत होते तेव्हा त्याला मी प्रकट झालो होतो की नाही?


तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan