Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:3
28 Iomraidhean Croise  

नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.


मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणवले असले,


परमेश्वर उपर्‍यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.


पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.


ते विधवा व उपरे ह्यांचा जीव घेतात, अनाथांना ठार मारतात.


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


तुझे अनाथ राहू दे; मी त्यांना जिवंत ठेवीन; तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवोत.”


अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.


तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.


तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.


मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले.


तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयावर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवतो.


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंदोत्सव करावास.


‘जो उपरा, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसर्‍यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो.


तरुणांना बंधूसमान मानून, वडील स्त्रियांना मातांसमान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानून बोध कर.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.


पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan