Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावीत, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्‍याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:14
19 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्‍यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”


मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्‍यात आहे.”


तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”


प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.


बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.


असे असता राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकार्‍यांनी चालवला; पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.


ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये.


जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील.


परंतु तरुण विधवांना नोंदवू नये, कारण जेव्हा त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोडतात तेव्हा त्या लग्न करायला पाहतात.


जे दास म्हणून जोखडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे; ह्यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये;


त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्‍या, मायाळू, आपापल्या नवर्‍याच्या अधीन राहणार्‍या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.


ह्यासाठी की, विरोध करणार्‍याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan