Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:8
52 Iomraidhean Croise  

“मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वत:चाच लाभ करून घेतो.


हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील;


तो आपले भय धरणार्‍यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.


पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.


नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.


दुष्कर्म करणार्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.


नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्‍या युगातही नाही.


आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.


म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे;


देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही, आणि खाण्याने आपण अधिक होत नाही.


अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर;


जर कोणी अन्य तर्‍हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करत नाही,


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]


चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे.


सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा.


हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत;


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.


जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.


मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.


तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan