Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 3:15
55 Iomraidhean Croise  

“मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव.


आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.


जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.”


परमेश्वराने मोशेला इस्राएलासंबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतार्थ होशील; दृढ हो, हिंमत धर, भिऊ नकोस, कचरू नकोस.


माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?


माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.


पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


तुम्ही ह्यापुढे, ‘परमेश्वराचे भारी वचन,’ असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला भारी आहे; तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव ह्याची वचने विपरीत केली आहेत.


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”


मी तुम्हांला खचीत सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”


आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.”1


त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला.


“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.


सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती.


“आणि असे होईल की, ‘तुम्ही माझे लोक नाही’ असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना ‘जिवंत देवाचे पुत्र’ असे म्हणण्यात येईल.”


यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;


तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.


देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’


सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या [तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून] तुम्हांला कोणी भुरळ घातली?


तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल;


मग परमेश्वराने नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला अधिकारसूत्रे देऊन म्हटले, “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश मी इस्राएल लोकांना शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुला त्यांना घेऊन जायचे आहे; मी तुझ्याबरोबर असेन.”


अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे?


ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले.


कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,


तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे;


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.


कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील?


ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.


आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे;


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan