Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 1:10
34 Iomraidhean Croise  

ते लोटाला हाक मारून म्हणाले, “आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”


चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले.


कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे; आणि येथेही ह्या बंदिखान्यात टाकण्याजोगे मी काहीएक केलेले नाही.”


तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.


एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्याजवळ सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.


ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करतात, करार करतात, म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल.


स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय.


कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”


तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्‍याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.


आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


जर कोणी अन्य तर्‍हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करत नाही,


ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यांमध्ये दृढपणे राख.


कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील,


ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,


आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करण्यास व उलट बोलणार्‍यांना कुंठित करण्यासही समर्थ व्हावे.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.


दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.


‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan