Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 5:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 5:22
15 Iomraidhean Croise  

खोट्या मुकदम्यापासून दूर राहा; निरपराधी व नीतिमान ह्यांचा वध करू नकोस, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.


जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,


वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.


म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.


आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही;


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा;


शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.


त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.


ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली, आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली; कारण बवाजने तिला सांगितले होते की, “खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.”


तो कोठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजून जा; मग काय करायचे ते तोच तुला सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan