Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 4:13
35 Iomraidhean Croise  

त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, “मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला.


तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”


नाहीतर जेव्हा आमचे स्वामीराजे आपल्या पितरांजवळ जाऊन निजतील तेव्हा मी व माझा पुत्र शलमोन ह्यांना गुन्हेगार गणतील.”


नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली.


तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.


आपले जवळचे आप्त म्हणजे आपली आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ,


थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;


मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”


कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;


मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.


भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला.


बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;


बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.


बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.


ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.


त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.


कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.


प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही.


प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.


ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.


“त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”


तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan