Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 बंधुजनहो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला विरहदुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 बंधुजनहो, आम्ही मनाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला दुःख होऊन तुम्हांला प्रत्यक्ष भेटण्याचा आम्ही फार उत्कंठेने प्रयत्न केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:17
16 Iomraidhean Croise  

बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?”


आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.”


इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.”


अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते.


तो त्याला म्हणाला, “तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय?


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्‍याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील.


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;


नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.


बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही, आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे;


मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे.


तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.


आता तीमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हांला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हांला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्यांविषयीचे सुवर्तमान आम्हांला कळवले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan