Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालवले; देवाला जे प्रिय ते, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 यहुदी लोकांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही ठार मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालविले. ते देवाला जे प्रिय आहे, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधक झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:15
21 Iomraidhean Croise  

हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही.


माझ्या विरोध्यांना, माझ्याविरुद्ध वाईट बोलणार्‍यांना परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो.


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


मग अमस्या आमोसाला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर;


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.


त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्‍यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले.


ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.


तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले.


आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहोत.


तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांतून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.


ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले.


ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.


तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’


मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan