Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत कार्य करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:13
41 Iomraidhean Croise  

“तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही.


तेव्हा शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला, आपला देव परमेश्वर ह्याने पाठवलेल्या हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले.


कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.


जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.


तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”


नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता.


हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे.


त्याने त्यांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”


जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.


तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.


आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.


म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”


हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला.


तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.


तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”


तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.


मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले;


ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केलात.


ही सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे.


कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.


कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्याचा ऐकणार्‍यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही.


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे ‘देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्‍या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात.


परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय.


‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्‍या दुधाची इच्छा धरा.


ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.


जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan