Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हा स्वत:लाही माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:1
18 Iomraidhean Croise  

ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्‍चिंत राहते;


परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.


मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचीत हे सगळे व्यर्थ.


मी तर म्हणालो होतो की, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.”


त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.


पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे,1 तीच सुवार्ता मी तुम्हांला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.2


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते.


तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.


असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.


ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत कार्य करत आहे.


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा की, तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan