Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 (पूर्वीच्या काळी इस्राएलात कोणी देवाकडे प्रश्‍न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की, “चला, द्रष्ट्याकडे जाऊ;” हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 (पूर्वी इस्राएलात कोणी परमेश्वराजवळ विचारायला जात असताना असे म्हणत, “चला आपण द्रष्ट्याकडे जाऊ.” कारण ज्याला आता भविष्यवादी म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा असे म्हणत.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याकाळी इस्राएलमध्ये जर कोणी परमेश्वराविषयी चौकशी करण्यास गेला तर ते म्हणत असत, “चला, आपण पाहणार्‍याकडे जाऊ,” कारण आज ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पाहणारा असे संबोधले जाई.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 9:9
16 Iomraidhean Croise  

तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली.


दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,


तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.”


परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद ह्याला म्हटले,


शमुवेल द्रष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर, आणि सरूवेचा पुत्र यवाब ह्यांनी ज्या वस्तू समर्पित केल्या होत्या त्या व इतरांनी ज्या समर्पित केल्या होत्या त्या सर्व शलोमोथ व त्याचे बांधव ह्यांच्या हवाली केल्या होत्या.


दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे.


सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते.


हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला, व त्याने त्याला अटकेत ठेवले; कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला.


त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे येऊन म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरवसा ठेवला नाहीस व अरामाच्या राजावर भरवसा ठेवला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे.


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


मग अमस्या आमोसाला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर;


सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?


यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला विचारले की, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी?”


ते त्याला म्हणाले, “ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पाहा.”


शौल आपल्या गड्यास म्हणाला, “ठीक आहे, चल आपण जाऊ.” मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरात ते गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan