Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 “आमचा न्यायनिवाडा करायला आम्हांला एक राजा द्या,” असे ते म्हणाले त्यामुळे शमुवेलास वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 8:6
18 Iomraidhean Croise  

मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करतात; मी तर प्रार्थनेत मग्न असतो.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”


तुझ्या सर्व नगरांतून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की, “मला राजा व अधिपती असावेत,” ते कोठे गेले?


तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.”


कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.


जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;


पण तुम्हांला सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणार्‍या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे, व तुम्ही त्याला म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आमच्यावर राजा नेमावा; तर आता वंशावंशांनी आणि हजाराहजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा.”


तरीपण अम्मोन्यांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहे असे तुम्ही पाहिले तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणालात, ‘हे ठीक नाही, आमच्यावर राज्य करण्यास राजा असावा.’


आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपल्यासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.”


तेव्हा सर्व लोक शमुवेलास म्हणाले, “आपल्या दासांप्रीत्यर्थ आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही; आम्ही राजा मागितला त्यामुळे आमच्या एकंदर पातकांना हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे.”


तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांला चांगला व सरळ मार्ग दाखवतो.


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan