Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 8:11
14 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.


त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.


शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्याजवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.


त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्याला उत्तर दिले, “हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या पित्याने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा, त्यांना असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे.


“आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.”


रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणार्‍यांच्या व राजवाड्याची रखवाली करत होते त्यांच्या स्वाधीन त्या केल्या.


परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.


नंतर शमुवेलाने लोकांना राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमुवेलाने सर्व लोकांना आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला.


शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.


तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांना म्हणाला, “बन्यामिनी लोकहो, ऐका; इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय आणि तो तुम्हा सर्वांना सहस्रपती व शतपती करणार आहे काय,


तर आता त्यांचे म्हणणे ऐक; पण त्यांची चांगली कानउघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan