Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला नि:शेष होम करून इस्राएलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेतले व त्याचा याहवेहला संपूर्ण होमार्पण म्हणून यज्ञ करून, इस्राएलच्या वतीने याहवेहकडे विनंती केली आणि याहवेहने ती ऐकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:9
16 Iomraidhean Croise  

आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


“वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल.


मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिसर देशातून काढून आणलेस त्याचा नाश करू नकोस.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.”


नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे.


तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा; मग मी होमबली अर्पण करायला व शांत्यर्पणांचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन; तू सात दिवस माझी वाट पाहत राहा; मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन.”


आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपल्यासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.”


शमुवेल म्हणाला, “मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारील.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की, ‘मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करायला आलो आहे.’


आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन; तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील; मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर चालेल.


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


तेव्हा त्या म्हणाल्या, “होय, आहे; पाहा, तो पुढेच आहे; त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे, आज लोक उच्च स्थानी होमहवन करणार आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan