Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी म्हणून सेवा करीत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:6
47 Iomraidhean Croise  

तसेच ‘मिस्पा’ हेही नाव तिला दिले; तो म्हणाला, “कारण आपण परस्परांच्या दृष्टिआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा-माझा साक्षी असो.


आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.


तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’;


त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.


यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


त्यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले; त्यांनी त्यांना संकटात घातले; तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला; तो तू स्वर्गातून ऐकलास व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिलेस.


माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत; पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत.


मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे.


तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही;


“पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो.


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे. आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे.


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


“तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.


मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


मी वळल्यावर पश्‍चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’


तेव्हा असे झाले की यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या मासी यरुशलेमेतले सर्व लोक व यहूदाच्या नगरांतून जे सर्व यरुशलेमेस आले होते त्यांनी परमेश्वरापुढे जाहीर उपवास नेमला.


अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत;


आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत.


तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यांना त्यांच्या वडिलांची अमंगळ कृत्ये विदित कर.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;


त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील,


मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे;


मिस्पे, कफीरा व मोजा;


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”


तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”


परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.


इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”


मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली.


त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.


हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते.


मग शमुवेलाने लोकांना मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले.


त्यांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, ‘आम्ही पातक केले आहे, कारण आम्ही परमेश्वराला सोडून बआल देव व अष्टारोथ ह्यांची भक्ती केली; तर आता आमच्या शत्रूंच्या हातातून आम्हांला सोडव म्हणजे आम्ही तुझी भक्ती करू.’


शमुवेलाने आपल्या आयुष्यभर इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan