Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 किर्याथ-यारीम येथे कोश राहिला त्याला बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे निघून गेली; त्यानंतर सर्व इस्राएल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ; म्हणजेच वीस वर्षे राहिला. तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:2
13 Iomraidhean Croise  

आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्‍न करीत नव्हतो.”


तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले.


परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता, त्याचे नाव उरीया; हा किर्याथ-यारीमकर शमायाचा पुत्र; यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने ह्या नगराविरुद्ध व ह्या देशाविरुद्ध संदेश दिला.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’


नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्‍या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.


परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.


ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो


तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan