Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर असे नाव दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:12
18 Iomraidhean Croise  

म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.


आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्याला तैलाभ्यंग केला.


हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत.


जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.


तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव ‘याव्हे-निस्सी’ (परमेश्वर माझा झेंडा) असे ठेवले;


त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.


तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही.


त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.


तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.


शौलाने परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांधली; ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली.


शमुवेलाची ही हकिकत सर्व इस्राएलात पसरली. ह्यानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले; त्यांनी एबन-एजर येथे तळ दिला, आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


इस्राएल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला, आणि ते बेथ-कारापाशी पोचत तोपर्यंत त्यांना ते मार देत गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan