Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग हे पाहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेथ-शेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आमच्यावर ही पीडा पाठवली होती; तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हांला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:9
13 Iomraidhean Croise  

तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.


माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;


तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.


ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.


मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला.


तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;


अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.


त्याप्रमाणे त्या लोकांनी केले; त्यांनी दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी कोंडून ठेवली.


त्या गाईंनी थेट बेथ-शेमेशचा रस्ता धरला; रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवीडावीकडे वळल्या नाहीत; पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.


ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका; त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हांला कळेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan