Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:5
30 Iomraidhean Croise  

अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.


परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली.


कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला)


तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


त्यांनी तसे केले; अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या; सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या.


त्याप्रमाणे परमेश्वराने केले; फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरांत आणि सगळ्या मिसर देशात गोमाश्यांचे थव्यांचे थवे आले; गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव ह्यांवर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर.”’


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.


मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.


देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.


त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.


मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.”


तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला.


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता.


तो कोश तेथे मिरवत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबालवृद्धांना पिडले; त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या.


मग परमेश्वराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याच्याकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा; मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan