Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग त्यांनी किर्याथ-यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तेव्हा त्यांनी किर्याथ-यआरीमच्या लोकांकडे हा संदेश देत दूत पाठविले, “पलिष्ट्यांनी याहवेहचा कोश परत केला आहे. इकडे या आणि तो तुमच्या नगराकडे घेऊन जा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:21
11 Iomraidhean Croise  

यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश.


त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता, त्याचे नाव उरीया; हा किर्याथ-यारीमकर शमायाचा पुत्र; यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने ह्या नगराविरुद्ध व ह्या देशाविरुद्ध संदेश दिला.


तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.


म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन;


किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.


तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.


तेथून मग पश्‍चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्‍चिम सीमा हीच.


नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्‍या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.


त्यांनी कूच करून यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने-दान (दानाची छावणी) असे म्हणतात. ते किर्याथ-यारीमच्या पश्‍चिमेस आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan