Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:20
13 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला.


त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?”


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.


कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”


तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.


कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’


हे पाहून अश्दोदकरांनी म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन ह्याच्यावर जबर पडला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan