Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:19
14 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला.


तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहायला परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील.


लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले; व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत.


निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


“कहाथी कुळांच्या वंशाचा लेव्यांतून उच्छेद होऊ देऊ नये;


पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये; गेले तर ते मरतील.”


गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतू हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावीत.


लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


Lean sinn:

Sanasan


Sanasan