Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्णप्रतिमा पाठवल्या त्या अश्दोदासाठी एक, गज्जासाठी एक, अष्कलोनासाठी एक, गथासाठी एक व एक्रोनासाठी एक अशा होत्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:17
19 Iomraidhean Croise  

गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.


हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले.


अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”


त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे.


परमेश्वर म्हणतो, “गज्जाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांना बंदिवान करून नेले.


पलीकडे कालनेला जाऊन पाहा, व तेथून महान हमाथाला जा, पलिष्ट्यांच्या गथाला जा, ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलूख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय?


परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज ह्यांची अशी पीडा लावील की, तू बरा होणार नाहीस.


ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली.


मग परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि तो अष्कलोनाला गेला. तेथली तीस माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले; आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला.


मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली, आणि तो तिच्याकडे गेला.


पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.


ते म्हणाले, “त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते?” ते म्हणाले, “पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan