Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हे पाहून पलिष्ट्यांचे पाच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:16
7 Iomraidhean Croise  

(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);


तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, “त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल, हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ.”


पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


त्या गाईंनी थेट बेथ-शेमेशचा रस्ता धरला; रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवीडावीकडे वळल्या नाहीत; पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.


ते म्हणाले, “त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते?” ते म्हणाले, “पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan