Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ती गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात जाऊन उभी राहिली; तेथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाईंचा परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अर्पण केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:14
13 Iomraidhean Croise  

त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्याला म्हणाला, “वरती जाऊन अरवना यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वरा-प्रीत्यर्थ एक वेदी बांध.”


अरवना दाविदाला म्हणाला, “माझ्या स्वामीराजांना जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे; पाहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीची औते व बैलांचे सामान आहे.


दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.


मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची औते पेटवून त्यांवर मांस भाजले; ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलीयाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून त्यांनी तेथे एक वेदी बांधली आणि होमबली व शांत्यर्पणे केली.


मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.”


तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता; त्याने विचारले, “लोक का रडतात? त्यांना काय झाले?” याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळवले.


तो म्हणाला, मला जाऊ दे, कारण त्या नगरात आमचे कूळ यज्ञ करणार आहे, आणि माझ्या भावाने मला तेथे बोलावले आहे, तर आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर मला जाऊ दे, म्हणजे मी आपल्या भावांना भेटून येईन; ह्यामुळेच तो राजाच्या पंक्तीला आला नाही.”


ह्या प्रसंगी बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात गव्हाची कापणी करत होते; त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला; तो पाहून त्यांना आनंद झाला.


ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या पाच सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते; ती धोंड यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात आजपर्यंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan