Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे पाहून अश्दोदकरांनी म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन ह्याच्यावर जबर पडला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 5:7
15 Iomraidhean Croise  

त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?”


पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”


फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?”


इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.”


फारो म्हणाला, “तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ करावा ह्यासाठी मी तुम्हांला जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका; माझ्यासाठी विनवणी करा.”


मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.”


तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो : “पाहा नो येथला आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याच्यावर भिस्त ठेवणारे ह्यांचा मी समाचार घेईन.


तुझी कर्मे व तुझे निधी ह्यांच्यावर तुझी भिस्त होती म्हणून तू हस्तगत होशील; कमोश आपले याजक व सरदार ह्यांच्यासह बंदिवान होऊन जाईल.


हायहाय, आता आमचे काय होईल! अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिसरी लोकांना तर्‍हतर्‍हेच्या पीडांनी पिडले तेच हे देव होत.


मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला; त्याने त्यांचा नाश केला; त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावांतील लोक ह्यांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले.


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.


बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan