Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अश्दोदकर दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 5:3
17 Iomraidhean Croise  

मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.


त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही.


जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो.


ओतार्‍याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्‍याने ऐरणीवर घण मारणार्‍याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.


ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.”


परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या मुलखात सात महिने राहिला होता.


ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan