१ शमुवेल 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता. Faic an caibideil |