Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, “देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 5:10
13 Iomraidhean Croise  

जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”


त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलाह आणि एजेर व एलद; ह्यांना गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यासाठी ते गेले होते.


मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


पलीकडे कालनेला जाऊन पाहा, व तेथून महान हमाथाला जा, पलिष्ट्यांच्या गथाला जा, ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलूख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय?


(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);


तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.


एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,


ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली.


मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले.


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता.


तो कोश तेथे मिरवत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबालवृद्धांना पिडले; त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या.


परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या मुलखात सात महिने राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan