Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा लोकांनी शिलो येथे माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणवला; देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 4:4
18 Iomraidhean Croise  

तेव्हा पाहा, सादोक व त्याच्याबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोश घेऊन आले; त्यांनी देवाचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथार वर राहिला.


यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश.


हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


एफ्राईम, बन्यामीन व मनश्शे ह्यांच्यासमक्ष तू आपला पराक्रम दाखव, आणि आम्हांला तारायला ये.


परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.


“सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.


आता परमेश्वराने आमच्यावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा; तुमच्या हातून हे घडले आहे; तुमच्या ह्या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा;


मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.


त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता.


अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते.


एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan