Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 4:21
12 Iomraidhean Croise  

त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणार्‍या बैलाची प्रतिमा स्वीकारली.


हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.


त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले.


त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.


जे देवच नाहीत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? तरीपण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे.


हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.


त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!


अहीया बिन अहीटूब (ईखाबोदाचा भाऊ) बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता; तो एफोद धारण करून त्याच्याबरोबर होता. योनाथान गेला हे लोकांना माहीत नव्हते.


तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास ह्यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल, ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील;


एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन.


परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला, आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले.


ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan