Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पलिष्ट्यांनी इस्राएलांशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली; लढाईस तोंड लागून पलिष्ट्यांपुढे इस्राएल लोक पराभव पावले; व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे चार हजार पुरुषांची रणांगणात कत्तल केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पलिष्ट्यांनी इस्राएलशी युद्ध करण्यासाठी त्यांचे सैन्य तैनात केले आणि जसे युद्ध वाढत गेले तसा पलिष्ट्यांद्वारे इस्राएलचा पराभव झाला, त्यांच्यापैकी सुमारे चार हजार लोकांना युद्धभूमीवर मारले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 4:2
13 Iomraidhean Croise  

चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.


कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही.


तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.


म्हणून इस्राएल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही; ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही.


इस्राएलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या.


तो उभा राहून इस्राएल सैन्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला, “तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्यरचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यांतला एक पुरुष निवडा, आणि त्याने माझ्याकडे यावे.


शमुवेलाची ही हकिकत सर्व इस्राएलात पसरली. ह्यानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले; त्यांनी एबन-एजर येथे तळ दिला, आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.


मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्‍याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.


लोक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलाचे वडील जन म्हणू लागले, “परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणू या; तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan