Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्‍याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 4:10
19 Iomraidhean Croise  

तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.


तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले.


तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांना कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांकडे पळून गेले. दावीद यरुशलेमेस परत येतो


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्‍याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांत चालते झाले.


सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.”


इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्‍याकडे पळ काढला.


अबीया व त्याचे लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली; त्या दिवशी इस्राएलातल्या पाच लक्ष निवडक पुरुषांचा संहार झाला.


इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्‍याकडे पळ काढला.


एफ्राइमाचे वंशज सशस्त्र व धनुर्धारी असूनही त्यांनी लढाईच्या वेळी पाठ फिरवली.


तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


उलटपक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील :


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा, मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.


पलिष्ट्यांनी इस्राएलांशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली; लढाईस तोंड लागून पलिष्ट्यांपुढे इस्राएल लोक पराभव पावले; व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे चार हजार पुरुषांची रणांगणात कत्तल केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan