Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 31:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारून पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 31:1
10 Iomraidhean Croise  

गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे.


तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.


शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता; इज्रेल येथून शौल व योनाथान ह्यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो पाच वर्षांचा होता; त्या वेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला; त्याचे नाव मफीबोशेथ असे होते.


पण तुम्ही दुष्कृत्ये करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल.”


त्या काळी पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी लढण्यासाठी आपली सैन्ये एकवटली तेव्हा आखीश दाविदाला म्हणाला, “हे पक्के समज की तुला आपल्या लोकांसह लढायला माझ्या सैन्याबरोबर यावे लागणार.”


शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केलास?” शौल म्हणाला, “मी मोठ्या संकटात पडलो आहे; पलिष्टी माझ्याशी लढत आहेत, आणि देवाने माझा त्याग केला आहे, आता मला तो संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नांच्या द्वारे माझ्या प्रश्‍नाचे उत्तर देत नाही; तेव्हा मी आता काय करावे ते तू मला सांगावेस म्हणून मी तुला बोलावले आहे.”


एवढेच नव्हे तर परमेश्वर तुझ्याबरोबर इस्राएल लोकांनाही पलिष्ट्यांच्या हाती देईल; उद्या तू आपल्या पुत्रांसह माझ्याकडे येशील; परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.”


पलिष्ट्यांनी एकत्र येऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली.


इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्‍याजवळ छावणी दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan