Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 30:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण दावीद म्हणाला, “बांधवहो, परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचे असे करू नका. त्याने आपले रक्षण केले आहे व जी टोळी आपल्यावर चाल करून आली होती ती आपल्या हातात दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा दावीद म्हणाला, “नाही, माझ्या बंधूंनो! याहवेहने आपणास जे काही दिले आहे त्याचे आम्ही असे करू नये. याहवेहने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे आणि छापा टाकलेली टोळी, आमचे शत्रू जे आमच्या विरोधात उठले त्यांना याहवेहने आमच्या हाती दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 30:23
16 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “बांधवहो, असले दुष्कर्म करू नका.


तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.


“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील.


तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस;


पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे.


घरधनी बाहेर जाऊन म्हणू लागला, “छे, छे! बांधवहो, मी हात जोडतो, असले दुष्कर्म करू नका; हा मनुष्य माझा पाहुणा आहे म्हणून असला निर्लज्जपणा करू नका.


परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो.


तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.”


ह्या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामानसुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.”


दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय?” त्याने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan