Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 3:19
32 Iomraidhean Croise  

त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे अब्राहामाला म्हणाले, “जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे.


पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”


परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे.


परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले.


“ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही.


हे पक्के समजा की अहाबाच्या घराण्याविषयी परमेश्वर जे म्हणाला आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ व्हायचा नाही. परमेश्वराने आपला सेवक एलीया ह्याच्या द्वारे जे सांगितले ते त्याने केले आहे.


परमेश्वराने येहूस सांगितले होते की, “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.” त्याप्रमाणे घडून आले.


परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजाने जो ग्रंथ वाचला त्यातील सर्व वचनांप्रमाणे ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर मी गहजब आणीन.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’


त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1


तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.


तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.


येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.


प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.


तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.


प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्याबरोबर कृपा असो.


परमेश्वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.


पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला; तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता.


ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस; कारण देव तुझ्याबरोबर आहे.


तर आता तो राजा तुमच्यासमोर वर्तत आहे; मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत आणि पाहा, माझे पुत्र तुमच्यामध्ये आहेत; मी बाळपणापासून आजवर तुमच्यासमोर वागलो-वर्तलो आहे.


तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”


परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलाला सोडले होते, ह्यामुळे दावीद शौलाला भीत असे.


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले.


आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला तीन पुत्र व दोन कन्या झाल्या. इकडे शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.


इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.


तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan