Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 3:13
17 Iomraidhean Croise  

“तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.


राजा शिमीला म्हणाला, “माझा बाप दावीद ह्याच्याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जिवाला ठाऊक आहे, तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईल असे करील.


हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.”


काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस,


छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.


कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.


आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोर्‍यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.


जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;


जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणार्‍या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही तो मनुष्य प्राणास मुकावा; अशा प्रकारे इस्राएलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावीस.


एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला,


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan