Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा, मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 3:11
11 Iomraidhean Croise  

म्हणून इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,“पाहा, मी यरुशलेम व यहूदा ह्यांवर एवढे अरिष्ट आणणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील.


पाहा, त्याला धरू पाहणार्‍याची आशा निष्फळ होते; त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय?


जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील.


राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.


भयाने व जगावर कोसळणार्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; कारण ‘आकाशातील बळे डळमळतील.’


‘अहो धिक्कार करणार्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’


तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”


मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्‍याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan