१ शमुवेल 29:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा आखीशाने दाविदाला बोलावून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्त्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे; कारण जेव्हापासून तू माझ्याकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठायी मला काही वाईट आढळून आले नाही; पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग आखीशाने दावीदाला बोलावून त्यास म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत. Faic an caibideil |