१ शमुवेल 29:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
4 पण पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; ते त्याला म्हणाले, “जे स्थळ तू त्याला दिले आहेस तेथे त्याला परत पाठवून दे; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर तो आमचा वैरी होईल; तो आपल्या स्वामीला दुसर्या कशाने प्रसन्न करणार बरे? ह्या लोकांची शिरे कापूनच की नाही?
4 मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्ट्यांचे सरदार त्यास म्हणाले, “जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही?
4 परंतु पलिष्ट्यांचे सेनापती आखीशवर रागावले होते आणि ते म्हणाले, “त्या मनुष्याला परत पाठवून दे, म्हणजे जे ठिकाण तू त्याला दिले आहेस तिथे त्याने परत जावे. त्याने आपल्याबरोबर लढाईमध्ये जाऊ नये, नाहीतर लढाई होत असताना तो आपल्याविरुद्ध लढेल. आपल्याच लोकांचे डोके कापण्यापेक्षा, त्याच्या धन्याची कृपा मिळविणे हे किती चांगले असेल?
शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”)
तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.”
तेव्हा जे इब्री पूर्वीपासून पलिष्ट्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीला येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या इस्राएल लोकांना येऊन मिळाले.
आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस.
दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,