Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 28:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि दोन माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला; तो तिला म्हणाला, “आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्याला उठवून माझ्याकडे आण.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 28:8
12 Iomraidhean Croise  

इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटाला सांगितले, “मी वेष बदलून लढाईला जाणार; पण आपण आपली स्वतःची वस्त्रे घाला.” ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईला गेला.


मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.”


शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्‍न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला,


इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटास सांगितले, “मी वेष बदलून लढाईस जाणार; पण तू आपली स्वतःची वस्त्रे घाल. ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईस गेला.


तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


त्यांच्यादेखत ते खांद्यावर घे व अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा; तू आपले मुख झाक म्हणजे भूमी तुला दिसायची नाही; कारण मी तुला इस्राएल घराण्यास चिन्हवत नेमले आहे.”


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan