Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 28:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 28:6
25 Iomraidhean Croise  

त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.


आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.


आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत.


तू न्यायाच्या ऊरपटात उरीम व थुम्मीम1 ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे; ह्या प्रकारे अहरोनाने इस्राएल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा.


उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


मग त्याने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”


असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.


आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.


मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्‍याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;


तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता.


शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांचा पाठलाग करू काय? तू त्यांना इस्राएलाच्या हाती देशील काय?” पण त्याने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.


शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केलास?” शौल म्हणाला, “मी मोठ्या संकटात पडलो आहे; पलिष्टी माझ्याशी लढत आहेत, आणि देवाने माझा त्याग केला आहे, आता मला तो संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नांच्या द्वारे माझ्या प्रश्‍नाचे उत्तर देत नाही; तेव्हा मी आता काय करावे ते तू मला सांगावेस म्हणून मी तुला बोलावले आहे.”


पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan