Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 28:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शमुवेल मृत्यू पावला होता; सर्व इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्याला मूठमाती दिली होती. शौलाने दैवज्ञ व मांत्रिक ह्यांना देशातून घालवून दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 शमुवेल तर मरण पावले होते आणि सर्व इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शोक केला होता आणि त्यांना त्यांच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 28:3
12 Iomraidhean Croise  

पण तिचा बाप त्याला ती द्यायला मुळीच राजी नसला, तर कुमारीबद्दल देज देण्याच्या वहिवाटीप्रमाणे त्या पुरुषाने पैसा तोलून द्यावा.


चेटकिणीला जिवंत ठेवू नये.


पंचाक्षर्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे, त्यांना दगडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षर्‍यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन;


अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”


पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.


ती स्त्री त्याला म्हणाली, “शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे; भूतविद्याप्रवीण व चेटकी ह्यांचे त्याने देशातून उच्चाटन केले आहे; आता मला मारून टाकावे म्हणून माझ्या जिवाला पाश का लावतोस?”


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan