Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 28:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो म्हणाला, “मला नको, मी खाणार नाही.” त्या स्त्रीप्रमाणे त्याच्या चाकरांनीही त्याला आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे ऐकले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 28:23
11 Iomraidhean Croise  

“मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.


एके दिवशी असे झाले की अलीशा शूनेम येथे गेला; तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे.


मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, “बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?”


तेथील पडदे पांढर्‍या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्‍यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्‍या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते.


थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्‍यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे.


तू उत्कृष्ट मंचकावर बसलीस, त्यापुढे मेज मांडून त्यावर माझा धूप व तेल ठेवले.


धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये.


परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला.


मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.


कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले;


तर आता आपणही आपल्या दासीचे म्हणणे ऐका; मी आपणाला घासभर अन्न वाढते ते खा म्हणजे वाटेने चालायला आपणाला शक्ती येईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan