Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 दावीद आणि त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून गेशूरी, गिरजी, आणि अमालेकी यांच्यावर स्वाऱ्या केल्या; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश आहे त्यामध्ये ही राष्ट्रे पूर्वीपासून वसली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 27:8
22 Iomraidhean Croise  

मग यवाब उठून गशूराला गेला व तेथून अबशालोमाला यरुशलेमेस घेऊन आला.


अबशालोम यवाबाला म्हणाला, “मला गशूराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते, असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून मी तुला येथे ये, असे सांगून पाठवले होते. तर आता मला राजाचे दर्शन करवून दे; मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे.”


मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.”


इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता.


कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;


अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळवलेली ही लूट होती.


गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय.


नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना.


मग अमालेक येऊन रफीदीम येथे इस्राएल लोकांशी लढू लागला.


नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्‍यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.”


तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.


आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.


तरी इस्राएल लोकांनी गशूरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही; गशूरी व माकाथी आजवर इस्राएलात वस्ती करून आहेत.


बाकी राहिलेला देश हा : पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश,


गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राइम्यांनी घालवून दिले नाही म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत; ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले.


एफ्राइमाने गेजेर येथे राहणार्‍या कनान्यांना घालवून दिले नाही; ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.


तेव्हा आखीशाने दाविदाला बोलावून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्त्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे; कारण जेव्हापासून तू माझ्याकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठायी मला काही वाईट आढळून आले नाही; पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस.


दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan