Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा अबीशय दाविदाला म्हणाला, “देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे; तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल; भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्‍यांदा वार करावा लागणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 26:8
16 Iomraidhean Croise  

सरूवेचा पुत्र अबीशय राजाला म्हणाला, “ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजांना शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवतो.”


तू मला वैर्‍याच्या कोंडीत सापडू दिले नाहीस; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.


तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”


परमेश्वराविषयी तुम्हांला काय वाटते?1 तो पुरापुरा अंत करील; विपत्ती दुसर्‍यांदा येणे नकोच.


त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.


मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांना त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केले.


मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


नंतर शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन त्याला खाऊ लागले.


परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे फळ देईल; आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.


तेव्हा दावीद व अबीशय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले; तेथे जाऊन पाहतात तर शौल छावणीच्या आड निजला आहे, त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अबनेर व इतर लोक त्याच्या सभोवती निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले.


दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan