Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 26:6
22 Iomraidhean Croise  

कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,


हित्ती, परिज्जी, रेफाईम,


अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथींना म्हणाला,


एसाव चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती ह्याची मुलगी यहूदीथ आणि एलोन हित्ती ह्याची मुलगी बासमथ ह्या बायका केल्या;


यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख ह्याला कोणी मारले? तेबेसात त्याच्यावर एका बायकोने कोटावरून जात्याची वरची तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेलात?’ तेव्हा त्याला तू एवढेच सांग की, ‘आपला सेवक उरीया हित्ती हाही मृत्यू पावला.”’


मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडले; राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरीया हित्ती हाही कामास आला.”


दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की, “उरीया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या.” तेव्हा यवाबाने त्याला दाविदाकडे पाठवले.


तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


राजाने यवाब, अबीशय व इत्तय ह्यांना आज्ञा केली की, “त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारांना जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली.


इकडे सरूवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावाजवळ गाठ पडली; तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसर्‍या बाजूला उतरले.


सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.


सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम,


उरीया हित्ती, मिळून एकंदर सदतीस.


एकेका रथाला सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्याला दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणत; हित्ती व अरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणत.


कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.”


यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :


तेव्हा दावीद व अबीशय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले; तेथे जाऊन पाहतात तर शौल छावणीच्या आड निजला आहे, त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अबनेर व इतर लोक त्याच्या सभोवती निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan